जिओच्या गॅलरीत कोयत्याचा धाक दाखवत ‘आयफोन’ चोरण्याचा प्रयत्न

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

डोंबिवली पूर्वेकडील एका जिओच्या गॅलरीत अज्ञात चोरट्याने कोयत्याचा धाक दाखवून आयफोन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर दुपारी या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास एक अज्ञात चोरटा या जिओच्या गॅलरीत शिरला. त्याच्या हातात कोयता होता. त्याने या कोयत्याचा धाक दाखवत महागडा आयफोन चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र जिओच्या गॅलरीत कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत आरडाओरड केल्याने या चोरट्याने तेथून पळ काढला. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्याचा शोध घेत आहेत. दरम्यान भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.