1 नोव्हेंबरपासून बदलणार सिलेंडरच्या डिलिव्हरीचा नियम ; जाणून घ्या नवे नियम

0

नवी दिल्ली : एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरी यंत्रणेत १ नोव्हेंबरपासून मोठे बदल होणार आहेत. तेल कंपन्या LPG सिलेंडरचं नवं डिलिव्हरी सिस्टम (Delivery System) लागू करणार आहेत. सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी कंपन्या डिलिव्हरी सिस्टिम लागू करणार आहेत. ही सिस्टिम नेमकी कशी असेल, जाणून घ्या..

 

घरगुती वापराचा सिलेंडर बुक केल्यावर काही दिवसांनंतर एजन्सीचे कर्मचारी तो घरापर्यंत घेऊन येतात, अशी सध्याची पद्धत आहे. मात्र १ नोव्हेंबरपासून यामध्ये महत्वाचा बदल होईल. आता सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असेल. ओटीपीशिवाय सिलेंडरची होम डिलेव्हरी होणार नाही. सिलेंडर ऑनलाईन बुक करताना ग्राहकांना पैसे भरावे लागतील. यानंतर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलेव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागेल. अन्यथा ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.

 

ही नवीन प्रणाली काय आहे आणि होम डिलिव्हरी कशी होईल, जाणून घेऊयात…

– या नव्या नियमाला DAC असं नाव देण्यात आलं आहे. म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड. आता फक्त बुकिंगवरच सिलेंडरची घरी पोहोचणार नाही तर त्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेला कोडही पाठवावा लागणार आहे. जर तुम्ही डिलिव्हरी बॉयला कोड सांगितला नाही तर तुम्हा सिलेंडरही मिळणार नाही.

 

– जर एखाद्या ग्राहकाने वितरका (Distributor) ला मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर डिलिव्हरी बॉयकडे एक अॅप असेल ज्याने तुम्ही तुमचा नंबर क्षणात अपडेट करू शकता.

 

– अशा परिस्थितीत, ज्या ग्राहकांचा पत्ता चुकीचा आहे आणि मोबाईल नंबर चुकीचा आहे अशा ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. यामुळे सिलेंडरची डिलिव्हरीदेखील थांबवली जाऊ शकते.

 

– तेल कंपन्यां या प्रक्रियेला सगळ्यात आधी 100 स्मार्ट शहरांमध्ये लागू करणार आहे. जयपूरमध्ये याचा पायलट प्रोजेक्टही सुरू झाला आहे.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पातून तेल कंपन्यांना 95 टक्क्यांहून अधिक फायदा झाला आहे. दरम्यान, ही सिस्टीम व्यावसायिक (commercial) सिलेंडरवर लागू होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.