गांव तेथे युवासेना, घर तेथे युवासैनिक निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्नशील रहावे

0

भडगांव (प्रतिनिधी) : गांव तिथे युवासेना,घर तिथे युवासैनिक हा विचार आणि निश्चय करुन त्या दिशेने सर्व शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी प्रयत्न केल्यास देशात कायम स्वरुपी खर्या अर्थाने शिवशाहिचे राज्य आल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन युवासेनेचे प्रदेश विस्तारक कुणाल दराडे यांनी युवासेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलतांना केले.

 

भडगांव येथील शिवतिर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात दि.२४ आॕक्टो रोजी युवासेनेचे प्रदेश विस्तारक कुणाल दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भडगांव शहर युवासेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ते बोलत होते सध्याच्या राजकीय परीस्थितत युवकांची भुमिका आणि कार्य खुप महत्वाचे आहे ज्या उमेदवाराजवळ युवकांची फळी भक्कम त्या उमेदवाराचा विजय निश्चित आसतो असे गणीतच सध्याच्या राजकारणात दिसते म्हणून देशात खर्या अर्थाने शिवशाहिचे राज्य आणायचे असेल तर गांव तेथे युवासेनेची शाखा आणि घर तेथे युवासैनिक निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्यांसह लोकप्रतिनिधींनी प्रयत्नशील रहावे असे त्यांनी आपल्या भाषणातून शेवटी सांगितले .या वेळी आमदार किशोर पाटील यांनी देखील गत विधानसभा निवडणूकितआपण भरपूर विकास कामे करुन देखील भडगांव तालुक्यातुन लिड तर सोडाच तिन हजार मतांनी मागे राहिलो.

 

युवासैनिकांची निवडणुकीत पाहिजे तसे काम दिसले नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त करत पुढिल कोणत्याही निवडणुकित अशी परिस्थिती निर्माण होणार नाहि हि काळजी आजपासुनच घेऊन आपण मतदार संघात युवासेनेची पुनर्रबांधणीकडे लक्ष घालत आहोत येणाऱ्या काळात या मतदार संघात शिवसेने ईतकिच किंबहुना त्यापेक्षाही एक पाऊल पुढे अशी युवासेना अपणास पहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी यांनी संघटना बांधणीवर आपले थोडक्यात विचार मांडले . प्रास्ताविक जे.के.पाटील यांनी केले याप्रसंगी व्यासपिठावर युवासेना प्रदेश विस्तारक कुणाल दराडे,आमदार किशोरअप्पा पाटील,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी,युवासेनेचे जिल्हा विस्तारक शिवराज पाटील,शिवसेनेचे तालुका प्रमुख डाॕ.विलास पाटील,शहर प्रमुख योगेश गंजे,किशोर बारावकर,शिवसेना अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाप्रमुख ईम्रान सैय्यद ,युवासेनेचे उपजिल्हा युवाधिकारी विनोद पाटील,जिल्हा सरचिटणीस लखिचंद पाटील,तालुका युवाधिकारी रविंद्र पाटील,शहर युवा अधिकारी निलेश पाटील,युवराज पाटील,डाॕ.प्रमोद पाटील,मा.नगरअध्यक्ष शशीकांत येवले,जगु भोई,संतोष महाजन,पिंटु गंजे,राहुल गंजे, सोनु खाटीक,अर्शद मिर्झा,हाशीमभाई मिर्झा,निसार मिर्झा,राजु शहा,बन्याभाई,निलेश राजपुत,दत्तु पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.