जामठी ग्रामपंचायत कार्यालयाला उपसरपंच व सदस्यांनी ठोकले टाळे !

0

बोदवड – तालुक्यातील जामठी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला उपसरपंच व सदस्यांनी यांनी आज टाळे ठोकले आहे. येथील ग्रामसेवक जी.एच.राठोड यांच्या दांडीमार पणाला व गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत कारभारच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक श्री.राठोड हे ग्रामपंचायत कार्यालय येथे येत नसल्याने नागरिकांनी गैरसोय होत आहे, नागरिकांना शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.येथील ग्रामसेवक गेल्या एक महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयात आलेचं नाहीत,गेल्या चार महिन्यांपासून मासिक मिटींग घेण्यात आली नसतांनाही खर्च मात्र वारेमाप होत असून गेल्या एक वर्षापासून या ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असून तेरिज पत्रक संशयास्पद असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.त्यामुळे या सर्व कारभाराची सखोल चौकशी होईपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला जाहीररीत्या टाळे लावत असल्याचे त्यांनी आज दि.२१ रोजी जामठी ग्रामपंचायत कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दिलेल्या निवेदनावर येथील ग्रामपंचायत उपसरपंच देविदास कडू पाटील,ग्रामपंचायत सदस्य ईश्वर महाजन,पत्रकार विकास नारायण पाटील यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.