‘दबंग ३’ची पहिल्या दिवसाची कमाई किती?

0

मुंबईः सलमान खानचा बहुप्रतीक्षीत ‘दबंग ३’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला असून, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २४ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.  boxofficeindia.com यांनी हा चित्रपट पहिल्या दिवशी २२ ते २४ कोटी रुपयांची कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली होती.

एका अन्य अहवालानुसार, देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे या चित्रपटाला १५ ते २० टक्क्यांचे नुकसान झाले आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा चित्रपट २५ कोटींचा आकडा पार करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, तो पल्ला हा चित्रपट गाठू शकला नाही. काही ठिकाणी चित्रपटगृहे लवकर बंद करण्यात आली. चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे नसल्याचे काही अहवालातून सांगण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.