२३ डिसेंबर पासून जळगाव-मुंबई विमानसेवा होणार सुरु

0

जळगावदि. : अनेक शहरांपासून प्रलंबित असलेली जळगाव विमानसेवा सुरु व्हावी यासाठी

जळगाव शहराचे आ.सुरेश दामू भोळे(राजूमामा) गेल्या ३ वर्षांपासून जळगाव येथून जळगाव- मुंबई विमानसेवा सुरु व्हावी यासाठी केंद्रीय विमानन उड्डयण मंत्री मा.ए.गजपती राजू व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांना वेळोवेळी सतत पाठपुरावा केल्याने तसेच माजी महसूलमंत्री मा.आ.एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री मा.ना.गिरीशभाऊ महाजन, खासदार मा.ए.टी.नाना पाटील, खा.रक्षाताई खडसे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यानेच जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे(राजूमामा) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

जळगाव येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विमानसेवा दि.२३ डिसेंबर २०१७ वार शनिवार रोजी जळगाव ते मुंबई पहिली विमानसेवा सकाळी ११.१५ मिनिटांनी व दुपारी ३.१० मिनिटांनी मुंबईसाठी उड्डाण घेणार असल्याबाबत सचिवालय, विमानन कार्यालय, मुंबई, यांचे कडून आमदार सुरेश दामू भोळे(राजूमामा) कळविण्यात आले आहे.

या विमानसेवेमुळे जळगाव जिल्हातील व उत्तर महाराष्ट्रातील पाईप उद्योग, प्लास्टिक उद्योग, डाळ व इतर क्षेत्रातील उद्योजकांना या सेवेमुळे फार मोठा फायदा होणार असून वेळेची बचत यामुळे होणार असून जळगाव शहर व जिल्ह्याला उद्योग व्यवसाय वाढीस या विमानसेवेने चालना मिळणार आहे.

हि विमानसेवा सुरु होत असल्याने केंद्रीय विमानन उड्डयण मंत्री मा.ए.गजपती राजू, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस तसेच माजी महसूलमंत्री मा.आ.एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री मा.ना.गिरीशभाऊ महाजन, खासदार मा.ए.टी.नाना पाटील, खा.रक्षाताई खडसे यांचे आमदार सुरेश दामू भोळे(राजूमामा) यांनी आभार व्यक्त केले आहे असे भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.