पिंपळगाव येथे जगन्नाथ यात्रा महोत्सव

0

पाचोरा – आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ पाचोरा आयोजीत श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव व पिंपळगाव हरे धामात प्रथमच उत्सव साजरा करण्यात येतआहे. पिंपळगाव हरे या पावन नगरित प्रथमच महामोत्सव होणार असून दिड ते दोन हजार भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या महामहोत्सवाला त्रिदंडी सन्यासीप. पू.रामगोविंद स्वामी महाराज दक्षीण आफ्रीका यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन असून रथयात्रेची सुरुवात अभय कॉलनी पिंपळगाव हरेयेथून सुरुवात होईल व कार्यक्रमाची सांगता श्री गोविंद महाराज मंदीर पिंपळगाव हरे येथुन होईल. महाप्रसाद व महाभोग अर्थात 56 भोग आरती देखील होणार आहे.
कार्यक्रमाची वेळ 5 ते 7 सुमधुर किर्तन, पुष्पाभिषेक, प्रवचन, 56 भोग दर्शन महाआरती प्रसाद, अन्नदान, भंडारा यामध्ये होईल रथयात्रा दुपारी 1वाजता सुरु होईल. आयोजन समस्त ग्रामवासी पिंपळगाव हरे व तालुका व भक्तवृंद यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.