१ लाख २७ हजार रुपयांच्या मुद्देमालासह एक शेळी लांबवली

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

वडगाव टेक येथे शेतकऱ्याच्या घराच्या लाकडी दरवाज्याला ड्रीलच्या सहाय्याने होल करुन घरात प्रवेश करत ८७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, ४० हजार रुपये रोख व ८ हजार रुपये किंमतीची शेळी अशा १ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह पोबारा केल्याची घटना घडली असुन, याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव (टेक) ता. पाचोरा येथील रहिवाशी विजय दिलीप पाटील यांनी पाचोरा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ४ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजुस असलेल्या लाकडी दरवाज्याला ग्रीलच्या साहाय्याने छिद्र करत घरात प्रवेश केला. घरात असलेली लोखंडी पत्री पेटी बाहेर नेवुन पेटीत ठेवलेले पत्नीचे २१ हजार रुपये किंमतीचे ७ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे दोन कानातील झुंबर, आईचे २१ हजार रुपये किंमतीचे ७ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या कानातील रिंग, ४५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचा अखंड गोल तुकडा, ५०० व १०० रुपयांच्या नोटा असलेले ४० हजार रुपये रोख तसेच घराजवळ बांधलेली ८ हजार रुपये किंमतीची शेळी असा एकुण १ लाख ३५ हजार रुपये किंमतीची चोरी करत घटनास्थळावरुन पोबारा केला.

पहाटे घटनेबाबत विजय पाटील यांना कळताच त्यांनी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला असुन, घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.