१० वीच्या निकालाची वेबसाईट झाली क्रॅश

0

आज  दहावीचा निकाल जाहीर  झाला आहे.  दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना दिसेल अशी माहिती देण्यात आलेली होती. मात्र एकाच वेळेला महाराष्ट्रातील विद्यार्थी निकाल बघत असल्याने, बोर्डाची साईड क्रॅश झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना निकाल बघण्यात अडचण येत आहे.

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

http://result.mh-ssc.ac.in

वरील वेबसाईटवर हा निकाल जाहीर करण्यात येत होता. परंतु आता वेबसाईट क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु बोर्डाकडून अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र विद्यार्थ्यांनी चिंता करू नये स्वतःचा रिजल्ट बघत राहावं प्रयत्न करत रहा असे आवाहन करण्यात येत आहे.

वेबसाईट सुरळीत कधी होईल :

सूत्रांच्या माहितीनुसार एकाच वेळेला लाखो विद्यार्थी वेबसाईटवर आपला निकाल बघत असल्याने वेबसाईट क्रॅश झाली. बोर्डाकडून वेबसाईट सुरळीत सुरू व्हावी यासाठी बोर्डाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. तासाभरात ही वेबसाईट सुरळीत सुरू होईल असे सूत्रांच्या माहितीनुसार समजते आहे. तरी विद्यार्थ्यांनी हताश न होता प्रयत्न करीत राहणे हाच एकच मार्ग आहे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.