होय, तिरंगा घेऊन नाचलो ! तुम्हाला कसले सुतक होते?

0

ना.गिरीष महाजन यांचा अजित पवारांना टोला

जामनेर (प्रतिनिधी) : – नाशिकमध्ये आलेल्या पुरपरिस्थितीचे मंत्री गिरीश महाजन यांना गांभीर्य नाही. सर्वदूर पुर परिस्थिती असताना ना.महाजन हे ३७० कलम रद्द करण्याचा आनंद साजरा करत नाचत होते. या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टिकेचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.आपल्या शासनाच्या काळात महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता तेव्हा आपण काय काय बडबडत होते ते सर्व जनतेला माहित आहे. मला सांगण्याची गरज नाही. कलम ३७० रद्द झाल्याने आम्हाला आनंद झालाच होता तुम्हाला कोठले सुतक पडले होते असा सवाल ना.महाजन यांनी अजित पवार यांना विचारला आहे.

नाशिक येथे गिरीश महाजन यांनी केलेल्या नाचायचा व्हिडिओ व्हायलर झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या वर टिका केली होती.महाजन यांचा उल्लेख त्यांनी नाच्या असा केला आहे. नाशिक मध्ये पुर आला तरी मंत्री नाचतात,नाचायचे काम तुमचे नाहीं मंत्री असे उदगार अजित पवार यांनी काढले होते.याबाबत महाजन यांनी दि.६ रोजी जामनेर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या वर टिकेची झोड उठवली. ना.महाजन पुढे म्हणाले की, वास्तविक मी ३ दिवस नाशिक मध्ये तळ ठोकून होते.१२-१४ तास छातीभर पाण्यात फिरत होतो.चांदोरी गावात ४-५ किं.मी. पाण्याचा वेढा होता त्या गावापर्यंत बचाव पथकाच्या बोटीतून प्रवास करून गावकऱ्यांना मदत केली या सर्व परीस्थितीची मला पुर्ण कल्पना होती.महाराष्टात ज्या ज्या वेळी एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा गिरीश महाजन तेथे जागेवरच असतो.मी घरात बसून फोनवर बोलत नाही.कलम ३७० हा आमच्या देशाला लागलेला कलंक होता,तो पुसण्याचे काम आमच्या सरकारने केले.त्याचा सार्थ अभिमान आम्हाला व प्रत्येक भारतीयाला आहे.म्हणून हातात तिरंगा ध्वज घेऊन नाचलो त्यात वाईट काय झाले असा प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, अॅड.शिवाजी सोनार,छगनदादा झाल्टे,नगरसेवक आतिष झाल्टे, दिपक तायडे,अरविंद देशमुख, गोविंद अग्रवाल आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.