बोढरे येथे शहरी व ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

0

चाळीसगाव :- तालुक्यातील बोढरे  येथे साई सहारा क्रीडा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शहर व ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन येथील युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले असून या उद्घाटनाप्रसंगी मंगेश चव्हाण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ” समाज जीवनात सर्वांनी खेळाडू वृत्ती अंगी जोपासली पाहिजे त्यानं माणसाचं मन व शरीर निरोगी राहते, या स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी झालेत त्या, सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन स्वतः त्यांच्यासोबत चव्हाण यांनी कबड्डी खेळ खेळून स्पर्धकांचा उत्साह वाढवला, या कबड्डी स्पर्धेचे साई साहरा क्रीडा मंडळाचे आयोजनाचे तिसरे वर्ष असून विजयी संघांना आकर्षक असे बक्षीस दिले जातात. यावेळी कार्यक्रमास बोढरे  येथील सरपंच साईदास जाधव, उपसरपंच चरणदास जाधव, ग्रामपंचायत सदस्य पितांबर जाधव, सखाराम जाधव, नामदेव गोपाळ, माजी सदस्य उत्‍तम राठोड, चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, तालुका भाजपा सरचिटणीस प्रा सुनील निकम, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटे, युवा मोर्चाचे योगेश खंडेलवाल, जगदीश चव्हाण , जयसिंग राठोड, तसेच भीमराव जाधव अर्जुन राठोड गुलाब राठोड पंडीत चव्‍हाण, उत्तम जाधव ,सुभाष जाधव, गोटीराम सोनार, आदी मान्यवरांसह सामने पाहण्यासाठी तरुणांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.