ना. महाजनांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

0

जळगाव | प्रतिनिधी 

भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (१५ ऑगस्ट) सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळवले आहे.

मुख्य शासकीय समारंभास शहरातील जास्तीत जास्त नागरीकांना भाग घेता यावा यासाठी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असेल तर त्यांनी तो त्यादिवशी सकाळी ८.३०च्या पूर्वी किवा ९.३५ नंतर करावा. जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, लेखक, कवी, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक, नागरीक, विद्यार्थी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.