हिवाळ्यात गाजराचे सेवन उपयुक्त व फायद्याचे …

0

लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जळगाव; गाजराला हिवाळ्यातील सूपरफूड म्हटलं जातं. कारण ते पोषक त्तवांनी परिपूर्ण असतं. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के सह मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

गाजर खाल्ल्याने रातांधळेपणाचा त्रास नाहीसा होता. तसेच दृष्टी सुधारण्यास मदतही होते. गाजरात असलेल्या बीटा कॅरोटीनचा फायदा होतो.  त्याचे पोटात व्हीटॅामिन ए मध्ये रूपांतर होतं.

गाजरात फॅलकारिनॉल नावाचे नैसर्गिक कीटकनाशक आढळून येते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.  वाढत्या वयानुसार अनेक त्रास उद्भवतात. मात्र गाजर खालल्याने वृद्धत्वाचा प्रभाव काही होण्यास मदत होते.

गाजर ज्यूसमध्ये काळं मीठ, कोथिंबीर, भाजलेले जिरे, काळी मिरी आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या कमी होईल.

गाजराचा आहारात तुम्ही सॅलड, भाजी, सूप, ज्यूस अशा विविध पद्धतीने देखील समावेश करु शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.