हाफिज सईदला १० वर्षांची शिक्षा

0

इस्लामाबाद ;- पाकिस्तानच्या अँटी टेररिज्म कोर्टाने दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला अवैध फंडिंग प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी मीडियाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. हाफिज सईदला मागच्या वर्षी 17 जुलैला अटक झाली होती. हाफिज मुंबईतील 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे.

सईदसोबत दोन आरोपी प्रो. जफर इकबाल आणि याह्या मुजाहिदला दोन प्रकरणात पाच-पाच वर्षांची आणि इतर एका प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, 1,10,000 रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे. यासोबतच, त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.