हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन; आरोपीला अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्या आरोपीला आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप मधुकर निकम (वय 25 रा. गेंदालाल मिल, जळगाव) याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी २६ जुन २०२१ रोजी पुढील दोन वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यातून आरोपी संदीप निकम याला हद्दपार केले होते.

दरम्यान आरोपी संदीप निकम हा जळगाव शहरातील जुने बसस्थानक परिसरात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पथकाने आरोपी संदीप मधुकर निकम याला जुने बसस्थानक परिसरातून सायंकाळी ७ वाजता अटक केली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रफिक पटेल यांच्या फिर्यादीवरून हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.