हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

0

भुसावळ :- विदर्भ तसेच मध्यप्रदेशात तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे.

हतनूर धरणाचे शाखा अभियंता एन. पी. महाजन यांनी दिलेली माहिती अशी की, धरणाच्या १२ दरवाज्यांतून प्रतिसेकंद ७७८ क्युमेक्स अर्थात २७ हजार क्यूसेस एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खान्देशातील जळगावसह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ तसेच मध्यप्रदेशात पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पाणी पातळीत अडीच मीटरने तर तापी नदीच्या पाणी पातळीत अर्ध्या मीटरने वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने तापी नदीवर अवलंबून असलेल्या दुष्काळी गावांतील पाणीयोजनांना या पुराचा फायदा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.