एम. एन. पाटील यांची नायब तहसिलदारपदी पदौन्नती

0

पाचोरा:- तामणी काॅलनी येथील रहिवासी व पिंपळगांव भागाचे मंडळ अधिकारी महेंद्र निंबा पाटील (एम. एन. पाटील) यांची नायब तहसिलदारपदी पदौन्नती होवुन भुसावळ तहसिल कार्यालयात बदली झाली आहे. एम. एन. पाटील यांची सन – १९९१ मध्ये तलाठी पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०१३ मध्ये मंडळ अधिकारी म्हणून पदौन्नती झाली. श्री. पाटील यांच्या पदौन्नतीचे तहसिलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसिलदार अमित भोईटे, नायब तहसिलदार उमाकांत कडनोर, चिंतामणी काॅलनीचे सचिव विनायक दिवटे, गुणवंतराव पवार, नंदकुमार शेलकर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.