कर्नाटकात बस आणि रिक्षाचा भीषण अपघात ; १२ ठार

0

कर्नाटकामधील चिंतामणी येथे बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२ जण ठार झाल्याची घटना आज घडली. तर २० पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत.  दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने या अपघातात रिक्षाचा अक्षरक्ष: चुराडा झाला आहे.

एक खासगी बस आणि रिक्षामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. यात बस आणि रिक्षामधील 12 प्रवाशी मृत्यूमुखी पडले असून 20 गंभीर जखमी झाले आहेत. घटनेतील जखमींना तातडीने स्थानिक रूग्णालयात दाखल केले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.  गंभीर जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.