स्वेच्छा मरणाची परवानगी द्या; एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती सद्यस्थितीत योग्य राहिलेली नसून, सतत तणावपूर्वक वातावरणात जगत  असल्यामुळे आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी मिळावी या आशयाचे निवेदन अमळनेर आगारातील कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की,एस. टी. महामंडळातील आम्हाला मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच इतर होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आमच्या काही एस. टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आमच्याही मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येतात, परंतु आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करु शकत नाही.

वारंवार निवेदने देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही कुणाच्याही दबावात न येता स्वेच्छा मरणाची परवानगी मागत आहेत. या संपाच्या मानसिक त्रासाला तसेच प्रशासनाकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणूकीला वैतागलो असून,महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने आपण एस. टी. महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी ‘कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येवून आम्हाला त्रासातून मुक्त करावे एस. टी. कर्मचाऱ्यांना जीवनदान द्यावे, अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनात केलेली आहे.निवेदनावर आगारातील १०० पेक्षा जास्त वाहक व चालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.