स्वप्न साकार करण्यासाठी ध्येय ठरवा:- राजेंद्र सोनवणे

0

जामनेर (प्रतिनिधी):-येथील श्री ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय जामनेर येथे इ.१२वी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नियमित व्यायाम, समतोल आहार,वाचनात सातत्य व सकारात्मक विचार ठेवल्यास निश्चित ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी केले. सदर कार्यशाळेची सुरुवात प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांचे हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद भोई यांनी केले.तर प्रास्तविक व परिचय प्राध्यापक नंदू पाटील यांनी केले.त्यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील शितल पाटील,सुवर्णा पांढरे,रूपाली पाटील,राहूल महाजन,धनंजय पाटील,प्रथमेश जोशी यासह सर्व प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी राहुल महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.