जळगावात तोतया डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

0

जळगाव : येथील जिल्हा रुग्णालयात डॉक्टर असल्याची बतावणी करुन वार्ड क्रमांक चारमध्ये 12 वर्षीय तरुणीची तपासणी करुन तिला इंजेक्शन देण्याच्या तयारीतील मद्यधुंद तोतया डॉक्टरला नागरीकांनी चांगलाच चोप दिला. मुकेश चंद्रशेखर कदम (वय 30 रा. मोहाडी) असे या तोतया डॉक्टरचे नाव असून त्याला जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात घेतले आहे. आज मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावातील १७ वर्षाची मुलगी हिच्या पोटात दुखत होते त्यामुळे त्यांनी आज जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले होते. दरम्यान, दुपारी संशयित आरोपी मुकेश कदम हा वार्ड क्रमांक चारमध्ये येवून आपण एमडी वैद्यकिय अधिकारी असल्याचे सांगून मुलीची टेटेस्कोपने तपासणी करू लागला यावर तरूणीचे वडील यांना शंका आल्याने त्यांनी वैद्यकिय महाविद्यालयातील नर्सला विचारले असता वैद्यकिय अधिकारी नसल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या कडे इंजेक्शन देण्याचे ॲम्बुल देखील होते त्यांनी तत्काळ त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयित आरोपी मुकेश कदमने पळ काढला.तेवढ्याच पाठलाग करत असलेल्या तोतया डॉक्टरला नागरिकांसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत कार्यरत सहाय्यक फौजदार किरण पाठक व पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे या कर्मचार्‍यांच्या स्वाधीन केले.

मी कुठलीही तपासणी केली नसून स्थेटेस्कोप माझा नसल्याचे तरुण सांगत होता. हा तरुण समाजसेवक म्हणून रोजच जिल्हा रुग्णालयात वावरत असल्याची माहिती मिळाली. संबंधित रुग्ण तरुणीच्या वडील यांनीही जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले होते. जिल्हापेठ पोलिसांची कारवाई सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.