जि प शाळा वरखेड येथे “सांस्कृतिक कार्यक्रम” संपन्न

0

भडगाव : तालुक्यातील वरखेड दिगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणं दिलीत, गीतं, नाटिका, नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातून देशभक्तीबरोबरच स्त्री भृण हत्या, राष्ट्रीय एकात्मता, प्रदूषण, पर्यावरण संवर्धन, जलसाक्षरता यासारख्या विषयांनाही हात घातला. याप्रसंगी सरपंच सौ. संगीताताई पाटील, केंद्रप्रमुख श्री. अशोक खेडकर यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ , तरुणयुवक पालक माता भगिनी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्याना रोख रक्कम बक्षिस स्वरूपात दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शिंपी यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री भिकन चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उषाबाई सूर्यवंशी, अशोक गायकवाड , मनोहर पाटील यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.