सोने-चांदी पुन्हा महागले : जाणून घ्या आजचा भाव

0

मुंबई : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. यामुळे सलग दुसऱ्या सत्रात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. आज सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे.  सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०२३३ रुपये आहे. त्यात २१ रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव एक किलोला ६२०६१ रुपये आहे. त्यात सध्या ९७ रुपयांची घसरण झाली आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.२ टक्क्याने वधारला असून तो प्रती औंस १८७४.२५ डॉलर झाला. चांदीचा भाव प्रती औंस ०.४ टक्क्यांनी घसरला असून तो २४.२४ डॉलर आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या भावात नफावसुली दिसून आली. त्यामुळे सोन्याचा भाव १९०० डॉलर खाली आला आहे. नजीकच्या काळात सोन्यात चढ उतार दिसून येतील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९९१० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०९१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९१७० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५३६३० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ५००८० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५२४८० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४७६२० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५२००० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.