उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

0

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीचं आयोजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ही बैठक सुरु होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत कोरोना लसीच्या वितरणाबाबतही चर्चा होऊ शकते. तसेच देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच इतरही निर्बंध लागू केले आहेत. अशातच मोदी पुन्हा देशव्यापी संचारबंदीचा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.