सेवाग्राम ते साबरमती यात्रेचे स्वागत

0

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

आज पाळधी तालुका धरणगाव येथे मोदी सरकार महात्मा गांधींच्या अहमदाबाद येथे असलेल्या साबरमती  आश्रमात जो अनाठायी बदल करू इच्छिते त्याला विरोध करण्यासाठी निघालेल्या सेवाग्राम ते साबरमती यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यात्रेने गावात प्रवेश केला तेव्हा जि प सदस्य प्रताप पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, दिलीपबापू पाटील, प्रकाश श्रीधर पाटील, आलिम देशमुख, विलास झवर, आमद शेठ, चंदु माळी, पप्पू माळी, सुल्तान शेठ, अरविंद मानकरी, डाॅ. व्ही. डी. पाटील, साजिद पटेल, शेख बशीर आदींनी यात्रेकरूंचे स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.