भरधाव वाहनाच्या धडकेत बालक ठार

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील भवानी मातेच्या मंदीरातील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर उमर्दे येथे  सखुबाई, अरूणाबाई व मंगा नाईक हे पवन रावसाहेब सोनवणे (वय  ७) याचा हात धरून पायी चालत असताना एम.एच.१९ बी.यू ६९०३ क्रमांकाच्या बोलेरो गाडीने पवनला ठोस दिली. ही घटना मंगळवारी १९ रोजी दुपारी एरंडोल-म्हसावद रस्त्यावर सनी इंडस्ट्रीज नजिक घडली.

या बाबत एरंडोल पोलीस स्टेशन सुञांनी दिलेली माहीती अशी की, पवनला जोरदार ठोस दिल्यानंतर बोलेरो गाडीचा चालक घटनास्थळी न थांबता म्हसावद कडे वेगाने निघुन गेला. मंगा नाईक यांच्या परीवाराने आरडा-ओरड केल्यावर संदीप पाटील, योगेश पाटील, संजय महाजन यांनी दुचाकीने जाऊन वाहनाचा पाठलाग केला व सदरील बोलेरो गाडी अडवुन चालकासह एरंडोल पोलिस स्टेशनला नेण्यात आली.

दरम्यान, पवनला धडक दिल्यानंतर तो काही एक हालचाल करीत नव्हता म्हणून त्याला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले, तो मृत झाल्याचे तपासाअंती घोषित करण्यात आले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला बोलेरो चालक मनोज मोहन राठोड रा.ढेकू तांडा ता. अमळनेर याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल संतोष चौधरी व विलास पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.