सुरत रेल्वे गेट बंद पडल्याने वाहतुक विस्कळीत, गेट उघडत असतांनाच यंत्रात बिघाड,

0
  सुरत रेल्वे गेट बंद पडल्याने वाहतुक विस्कळीत
गेट उघडत असतांनाच यंत्रात बिघाड, अपघात होण्यापासून नागरीक बचावले
जळगांव.दि.30- शहरात शिवाजीनगर रेल्वे उड्डाण बंद असल्याने वाहतुक विस्कळीत होणे वा नागरीकांची दररोजच गैरसोय होणे हि नित्याची बाब बनली आहे. आज 30 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास रेल्वे गेल्यानंतर सुरत रेल्वे गेट उघडत असतांनाच अचानक मधेच यंत्रात बिघाड होउन बंद पडले. ते नागरीकांच्या वाहनांवर येत असतांनाचे पाहून नागरीकांनी वेळीच स्वताचा बचाव केल्याने अपघात होण्यापासून बचावले आहे.
  शहरातील जळगांव टॉवर चौक ते शिवाजीनगर दुध सोसायटी वा अन्य ग्रामीण परीसरराला जोडणारा अतिशय वर्दळीचा रस्ता शिवाजीनगर उड्डाणपुल  नुतनीकरणास्तव गेल्या दिड महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. ऐन दहावी बारावी परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना या सुरत रेल्वे गेटचा वाहतुक खोळबल्याने फटका सहन करावा लागला आहे. तर दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने हा मार्ग वादाचे कारण बनत आहे. आज दुपारी र.30 च्या सुमारास रेल्वे गेल्यानंतर गेटमनने गेट उघडले, त्यात यांत्रिक बिघाड होउन ते असलेल्या रस्ता ओलांडणार्‍या नागरीकासह वाहनावर येत असल्याच पाहून नागरीकांनी आरडाओरड करत वाहने सुरक्षीत ठिकाणी नेली त्यामुळे अपघात होण्यापासून नागरीक थोडक्यात बचावले. रेल्वे प्रशासनाने या घटनांकडे गंभीरतेन लक्ष देण्याची गरज आहे असे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.