भडगावात पती पत्नी आणि मुलीच्या सामूहिक आत्महत्याने खळबळ

0

भडगाव | प्रतिनिधी
मागील आठवड्यात ९ वर्षीय बालक सय्यद इसम सय्यद बाबू याचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह पाचोरा रोडवरील रजनीताई देशमुख महाविद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या केळीच्या शेतात सापडला होता. पोलिसांचा तपास सुरू असतानाच आज त्याचे वडील नामे – बब्बु लल्लन सय्यद (वय 48), आई- पिंकी बब्बु सय्यद (वय – 38) बहीण स्नेहा बब्बु सय्यद ( 15 वय) यांनी घरात साण्याच्या लोखंडी रॉड ला दोर बांधून सामूहिक आत्महत्या केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या बाबत भडगाव पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी नेहमी प्रमाणे हा परिवार सकाळी 5 वाजता उठला व बाबू सय्यद याने सकाळी घराच्या बाजूला मज्जिद मध्ये 5.30 वाजता नमाज पठण केले . यानंतर घरात गेल्यावर दरवाज्याची आतील कडी लावून घेतली बराच वेळ उलटल्याने ही घटना उघडकीस आली.. या नंतर घटना स्थळी पोलिसांनी धाव घेत अगोदर दरवाज्याचा कडी कोंडा तोडला तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेत. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृताना शव विच्छेदन साठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपविभागीय अधिकारी नजीर शेख, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे, व पोलिस कर्मचारी, आदीनी माहिती जाणली. जळगाव येथून स्वान पथकास पाचारण करण्यात आले होते या बाबत भडगाव पोलिस स्टेशन
इलियास बेग मुराद बेग मिर्झा रा. टोंणगाव भडगाव यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
. आत्महत्या की,घातपात? याबाबत शहरात चर्चा उपस्थित होत आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र या घटनेचे कारण समजू शकलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.