सुरत मार्गावरील रेल्वेगेट दुरुस्तीसाठी तीन दिवस बंद 

0
जळगाव :
जळगाव- पाळधी मार्गावरील दूध फेडरेशनजवळील रेल्वेगेटचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरु होणार असल्याने दि. १९ ते २१ मार्चदरम्यान रेल्वेगेटवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे रा.प. महामंडळामार्फत सोडण्यात येणाऱ्या कानळदा, आव्हाणे, नंदगाव, चोपडा, यावल, भोकर, पळसोद आदी मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. मात्र, या गावातील प्रवाशांची शहराशी नाळ जोडलेली असल्याने त्यांना शहरात येता यावे यासाठी शिवाजीनगर येथील जे.के. जिनिंग प्रेस येथून रा.प. बसेस सुटतील व तेथेच थांबतील; त्या नवीन बसस्थानकात येणार नाहीत, याबाबत प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर, विभागीय वाहतूक अधिकारी प्र.ना. घुले यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.