जामनेर नागरपालिकेसाठी  ४९ अर्ज दाखल 

0
आज दिग्गजांकडून होणार अर्ज दाखल 
जामनेर :
येथील नगरपालिकेसाठी दि. १७ रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवसा अखेर ४९ अर्ज दाखल करण्यात आले आहे. दि. १७ रोजी ३४ उमेदवारांतर्फे एकुण बेचाळीस अर्ज दाखल करण्यात आले. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज दिग्गज मंडळी अर्ज दाखल करण्यासाठी असंख्य समर्थकांसह उमेदवार हजर राहण्याची शक्यता आहे .
 १७ रोजी भाजपातर्फे सपना रवींद्र झाल्टे, दीपाली नरेंद्र धुमाळ, माधुरी जितेंद्र काळे, शेख हसीनाबी ईब्राहीम, सैयद रजीयाबी किफायत, खान युनूस खान हनीफ, अतुल दत्तात्रय सोनवणे, डॉ. संजीव नामदेव पाटील, सुनिता संजीव पाटील, प्रवीण इंदरचंद डांगी, पुष्पा प्राविण डांगी, शोभा देवीदास माळी, खान नजमुन्नीसाबी रमजान खान, शेख शहनाज बेगम न्याजमोहम्मद तर काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अलीशानबी रशीद, शेख रऊफ महमुद, खान अन्वर मन्सुरखान, शेख जावेद ईकबाल रशीद, शेख शाहीस्ता परवीन जावेद ईकबाल, शेख परवीन शेख मजहर अली, शेख अशीराबी खालील, खान शहनाज अहमद मोहम्मद खान, शेख चिरागोद्दीन बिसमील्ला, खान दानीश युनुस, अशोराबी शेख खलील, मनोजकुमार कडु पाटील, गजानन पंडीत गव्हारे, मनीष भिमराव पाटील, शामद कमरू तडवी, शेख नसिमबानो ईस्माईल यांनी उमेदवारी दाखल केली आहे. यासह मंगला सुरेश माळी, सैयद बिलाल अहमद, अविनाश लक्ष्मण बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. काही जणांतर्फे सावधगिरी म्हणून दोन-दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे. .
कारण दोन्ही काँग्रेस पक्षांची अद्यापही आधिकृतपणे आघाडीची घोषणा झाली नाही. तर स्वबळाची घोषणा करणाऱ्या शिवसेनेकडून एकाही उमेदवाराने अद्याप अर्ज दाखल केलेला नाही. .तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीही उमेदवारी अर्ज दाखल नाही. सोमवार दि. १९ अखेरच्या दिवशी मात्र नगराध्यक्षपदासह आणखी बड्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.