सीसीआय कापुस खरेदी केंद्रात ‘मापात पाप’

0

शेतकऱ्यांची होतेय आर्थिक लूट?


बोदवड | प्रतिनिधी सुनिल बोदडे
तालुक्यातील शेतकऱ्यांना कायम दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.यंदा मुबलक पाऊस झाला.मात्र स्पटेंबर व नोंव्हेंबर महिन्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.त्यामुळे शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे.

तालुक्यात ज्वारी,मका व पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच
दि.२१/११/२०१९ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापुस खरेदीसाठी नाडगाव रोडवरील सिद्धी विनायक कोटेक्स येथे भारतीय कपास निगम ‘सीसीआय’ केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.मात्र हे कापुस खरेदी केंद्र शेतकऱ्यांचे आर्थिक फसवणूकीचे ठिकाणी बनत आहे.याचे कारण असे की, सीसीआय कापूस खरेदी केंद्रात आद्रता (ओलावा) असल्याच्या बहाना पुढे करीत क्विंटलमागे पाच किलोची घट लावली जात आहे.हे घट लावण्याचे नियम, निकष कोणत्या नियमानुसार लावले जात आहेत? हे मात्र शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे.
राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट पाहता व काळासोबत बाजारभावाच्या तुलनेत पणन महासंघाकडून शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्याने परिणामी केंद्र सरकारने आपल्या भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) केंद्राच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू केली आहे.या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग येथे कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत.
‘सीसीआय’च्या नियमानुसार ८ टक्के आर्द्रता (ओलावा) असल्यास ५५००/- रुपये हमी भाव देणे अपेक्षित आहे.८ ते १२ टक्के ओलावा असल्यास २० ते १०० रूपये कमी दराने कपास खरेदी करण्याचे निर्देश आहेत.मात्र हे नियम धाब्यावर बसवत ‘मापात पाप’ करून येथे येत असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे क्विंटल मागे पाच किलो कापूस कपात केला जात असेल तर दिवसभरात खरेदी करण्यात आलेला लाखों क्विंटल कापसा पैकी प्रत्येकी क्विंटल मागे कपात करण्यात आलेला पाच किलो कापूस कपात करून शेतकऱ्यांची दिवसागणिक ३ ते ४ लाख रुपयांची आर्थिक लूट करून कोण आर्थिक स्थिती भक्कम करीत आहे.? यामध्ये संबंधित अधिकारी ७५ % व काही कापस जिनिंग धारक यांची २५% मिलीभगत तर नाही ना?
असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
एकीकडे शेतकरी वर्ग पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला असतांना ही होणारी लूट पाहता ही होणारी लूट तात्काळ थांबवून आजपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या शेतक-यांच्या मालाचीही फेरी मोजणी व्हावी व त्यांनाही न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.तसेचं खरेदी केंद्रावर कपाशी मधील सरकी काढून ती दातांच्या साह्याने कुरतडून त्या मालाची आर्द्रता ठरवली जात असल्याची शक्कल लढवली काही अधिकारी लढवित असल्याचेही शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.