वाढदिवस आणि साखरपुड्याचे औचित्य साधून गरजू मैत्रीणींना केली आर्थिक मदत

0

बोदवड येथील नगरसेवक डॉ.सुधीर पाटील यांच्या कन्या अनुष्का पाटील यांचा समाजापुढे एक आदर्श

बोदवड (सुनिल बोदडे) :- शहरातील नगरसेवक डॉ.सुधीर पाटील यांच्या कन्या अनुष्का पाटील यांचा आज दि.१/१२ रोजी वाढदिवस आणि आजचं त्यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम.हा कार्यक्रम शहरातील नाडगाव रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात पार पडला.या दोन्ही दिनाचे औचित्य साधून त्यांनी समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे.आपल्या वाढदिवसा वरील अतिरिक्त खर्च टाळून आपल्या तीन गरीब व गरजू मैत्रीणींना आर्थिक मदत व्हावी म्हणून आज आपला साखरपुडा (एंगेजमेंट) व वाढदिवस या एकाच दिवशी आलेल्या योगायोग चे औचित्य साधून ३३ हजार रुपयांची मदत त्यांना केली.

याबाबत अधिक असे की, शहरातील नगरसेवक डॉ.सुधीर पाटील यांच्या कन्या चि.सौ.का.अनुष्का पाटील यांचा विशालसिंह यांच्यासोबत साखरपुड्याचा कार्यक्रम शहरातील नाडगाव रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात पार पाडला.आज अनुष्का पाटील यांचा वाढदिवस आणि आजचं त्यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम हा योगायोग जुळून आल्याने त्यांनी आपल्या वाढदिवसावरील अतिरिक्त खर्च टाळून आपल्या दोन मैत्रिणी कि,ज्यांना वडिल नाहीत व एक अल्पभूधारक गरीब शेतकरी वर्गातील अशा तीन मैत्रीणींना प्रत्येकी ११ हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदतीचा हात दिला.

अनुष्का पाटील यांनी भाग्यश्री दिलीप तेली,(सनंसे) रा.बोदवड,कविता रामचंद्रसिंह पाटील,वरखेड आणि श्र्वेता सतिष पाटील,धोंडखेडा या आपल्या तिन्ही मैत्रीणींना साखरपुड्याच्या ठिकाणी बोलवून त्याजागी त्यांना हे प्रत्येकी ११ हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत करून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. या डोळस निर्णयाबद्दल नगरसेवक डॉ.सुधीर पाटील,अनुष्का पाटील,व संपुर्ण पाटील परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.