एरंडोल न.पा तर्फे आज कोरडा दिवस मोहीम

0

एरंडोल | प्रतिनिधी 

येथे आज रोजी नगरपालिकेतर्फे कोरडा दिवस मोहीम राबविण्यात आली. या दिवशी न.पा. कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन साथीच्या आजारात संदर्भात विविध उपाययोजना  बाबत माहिती देण्यात आली तसेच पाणी साठवून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या. नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस पाण्याची सर्व भांडी व टाक्या कोरड्या कराव्या असे आवाहन करण्यात आले.

नगराध्यक्ष रमेश परदेशी, देशमुख मुख्याधिकारी किरण देशमुख कार्यालयीन अधिक्षक संजय ढमाळ, पाणीपुरवठा अभियंता प्रियंका जैन, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन यांनी  सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.