सीबीएसई : दहावीचे निकाल घोषित

0

नवी दिल्ली :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता १ २ वीच्या निकालाप्रमाणेच आज इयत्ता १०वीचे निकाल घोषित करत सीबीएसईने सरप्राइझ दिले आहे. आज निकाल घोषित करण्याबाबत सीबीएसईने कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. मात्र, आज अचानक दुपारी ३ वाजता निकाल लावणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. असे असले करी सीबीएसईने २ वाजता गे निकाल घोषित केले. यंदा, इयत्ता १० वीमध्ये एकूण १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर, २४ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९८ गुण मिळवले आहेत. इयत्ता दहावीचे निकाल घोषित केले आहेत.

 

असा पाहा निकाल –

पहिली पायरी – cbse.nic.in या वेबसाइटवर जा

दुसरी पायरी – CBSE 10th Result 2018

ही लिंक शोधा व तिच्यावर क्लिक करा

तिसरी पायरी – आपला रोल नंबर भरा

चौथी पायरी – तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड करा म्हणजे तो तुम्हाला नंतरही उपयोगी येऊ शकेल.

सीबीएसई दहावीसाठी देशभरात 18 लाख विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षी 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 88.67 टक्के इतकं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.