सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना पूर्णतः क्‍लीन चिट नाही : गिरीश महाजन

0

जळगाव – अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणात क्‍लीन चिट देण्यात आलेली नसून त्यांची हजारो प्रकरणात चौकशी होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. एक-दोन प्रकरणात नागपूर खंडपीठात एसीबीने कागदपत्र सादर केली असली तरी अजून बऱ्याच प्रकरणात चौकशी होवू शकते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांच्या काळात अजित पवार यांच्या मदतीने मुख्यमंत्री पद घेतले असले तरी त्यांनी क्‍लीन चिट दिली नसल्याने महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, माजी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना नागपूर पाठोपाठ अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांना क्‍लीन चिट देण्यात आली आहे. या घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलली आहे. तसेच ही प्रकरणे भाजप सरकारच्याच काळात पूर्ण करण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे घोटाळ्याचे 72 हजार कोटी कुणाच्या खिशात गेले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.