सावधान ! महाराष्ट्रात स्ट्रेनचा शिरकाव; ८ जणांमध्ये आढळली लक्षणं

0

मुंबई: ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

 

ब्रिटनहून परतलेल्या ८ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी ट्विट करून दिली. ‘ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यात मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे,’ अशी माहिती टोपेंनी दिली.

गेल्या आठवड्यात देशातल्या सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेतली गेली. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणचा, वितरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. राज्यातील ८ जणांमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आल्याची माहिती याच बैठकीतून समोर आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित महापालिकांचे आयुक्त आणि आरोग्य विभागाशी संवाद साधला आणि त्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.