जिल्ह्यात आज ६१ नव्या रुग्णांची नोंद ; तर ३४ कोरोनामुक्त

0

जळगाव : आज सोमवारी प्राप्त अहवालात ६१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात ३४ बरे झाले. आज चौथ्या दिवशीही मृत्यूची नोंद झाली नाही, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या घटू लागली आहे. थंडीच्या कडाक्यासोबत रुग्ण वाढतील, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, ती सध्यातरी फोल ठरली आहे. आज सोमवारी ६१ नव्या बाधितांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ५६ हजारांच्या वर गेली आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५६ हजार ०३९ वर गेली आहे तर ३३ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार २४४ झाला आहे. जिल्ह्यातील बळींची संख्या १३२९ आहे. सध्या जिल्ह्यात ४६६ ॲक्टिव रुग्ण आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर – २९, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ- १०, अमळनेर- ०२, चोपडा-१२, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०३, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-०१, पारोळा-०२, चाळीसगाव-०१, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ६१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.