सावदा येथे शेकडोंच्या उपस्थितीत बारागाड्या उत्साहात

0

सावदा  – येथील  स्थानिक व परिसरातील नागरिकांचे  श्रद्धस्थान असलेले   असलेल्या  आठववड्या बाजार जवळील खंडेराव  महाराज देवस्थान येथे मल्हारी मार्तंड व बानू देवी व म्हाळसा देवी यांचे जुने जागृत देवस्थान आहे.

येथे  सालाबादप्रमाणे या वर्षी ही दि;2 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास  भगतबुवा अशोक      वसंत पवार हे बारागाड्या ओढल्या त्यांना आकाश वंजारी व राहूल पवार हे साथी ला होते.

आज सकाळी मंदिरात तडी भरण्यात आली नंतर आरती करण्यात आली दुपारी 4 वाजता नवरत्न करून  ग्राम प्रदक्षिणा करून पाच वाजेला सर्व बारागाड्यांची   पाच वेळा प्रदक्षिणा घालून पूजा करण्यात आली.

संध्याकाळी 5 वाजता संतोष जोशी पंडित  यांनी विधीवत देवतेचे पूजन केले व आरती होऊन भगत यांनी नवरता सह प्रदक्षिणा सर्व गाड्यानं मारून  अशोक भगत यांनी  मल्हार साहेब जी जय,सुवडू बुवा की जय,गोविदा बुवा की जय, शिरमुड बुवा की जय, च्या जय घोषात बारा गाड्या  ओढल्या यावेळी खासदार रक्षा खडसे,नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे , माजी नगरसेवक शाम पाटील ,प्रल्हाद बक्षे,आकाश वंजारी,राहुल पवार,प्रमोद वाघूळदे,गोपाळ नेमाडे,मनोज नेमाडे,रोशन वाघूळदे,गुणवंत वाघूळदे,गौरव भंगाळे,गणेश माळी,मेघश्याम धांडे,रामदास नेमाडे,उमाकांत नेहते,अतुल नेहते,भीमराज भारंबे,त्रबक वाघूळदे,सागर पाटील गजू नेहते,पूर्वेश खाचने हे उपस्थित होते

यात्रे निमित्त्नने  मोठी गर्दी बरगड्यां पाहण्या करिता दुतर्फा महिला पुरुष उभे होते . खेळणीचे , फराळाची दुकाने थाटली जातात .यावेळी यावर्षी जय मल्हार ग्रुपचे कार्यकर्ते सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.