सामरोदच्या जंगलात 20 निलगायी 10 रानडुकरांचा संशयास्पद मृत्यू

0

अज्ञाताने पाण्यातून वीष प्रयोग केल्याचा अंदाज

जामनेर, दि. 28

तालुक्यातील सामरोद शिवारामध्ये एकूण 19 निलगायी (रोही) आणि 10 रानडुरे मृत्युमुखी पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. घटनेबद्दल प्राणीमित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जंगलात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणी मृत्युमुखी पडल्याने गावकर्याांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. नीलगायी मारण्यासाठी अज्ञात व्यक्तीने पाण्यामध्ये विषप्रयोग केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबतचे वृत्त असे की, सामरोदला मोठा जंगल परिसर आहे. या जंगलामध्ये नीलगायी (रोही), रानडुकरे, हरिण, बिबट्यांचा वावर नेहमी जाणवतो. यापैकी नीलगायी आणि रानटी डुकरांचा शेतकर्याांना शेतीतील पिकांबाबत फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने नीलगायी व रानडुकरांना मारण्याचा डाव रचून पाण्यामध्ये विष प्रयोग करून या जंगली प्राण्यांना मारण्याचा प्राथमिक अंदाज गावकर्याांमधून वर्तवला जात आहे. सामरोद- मोढाखेड, सामरोदा- मोयखेडा दिगर रस्त्याच्या बाजुला जंगल परिसराला लागून चिंधु शिवराम नाईक यांचे शेत आहे. गट नं. 278 मध्ये एक छोटे धरण आहे आणि या धरणामध्ये एक पाणवठा आहे. पाणवठ्यामध्ये अल्पप्रमाणात पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यााचे दिवस असल्यामुळे या पाणवठ्या व्यतिरिक्त जंगली प्राण्यांना पिण्यासाठी कुठेही पाणी उपलब्ध नाही. या संधीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात व्यक्तीने या पाण्यामध्ये वीष टाकल्याचा अंदाज आहे. हे पाणी नीलगायी व रानडुकरांचा पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा हा जरी अंदाज असला तरी या प्राण्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे वैद्यकिय अहवाल आल्यानंतरच कळणार आहे.

नीलगायी व रानडुकरांचा शेतकर्याांना अत्यंत त्रास असल्यामुळे कााही शेतकरी आपल्या शेताला तारेचे कंपाऊंड करून त्यात विजेचा प्रवाह सोडताता. जेणेकरून विजेचा शॉक लागल्यानंतर हे जंगली प्राणी शेतात घुसत नाहीत. त्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही. परंतु उन्हाळा असल्यामुळे परिसरामध्ये कुणाच्याच शेतामध्ये हिरवीगार पिके नाहीत. त्यामुळे शॉक लागून या प्राण्यांचा मृत्यू झाला असता तर त्या ठिकाणी हे प्राणी मृत्युमुखी पडले आहेत त्या ठिकाणी तारेचे कंपाऊंड दिसून आले असते. परंतु त्या ठिकाणी कोणतेही तारेचे कंपाऊंड नाही. त्यामुळे या जंगली जनावरांचा मृत्यू पाण्यात वीष प्रयोग करून केल्याचा अंदाज आहे.

सर्वप्रथम या घटनेची माहिती पत्रकारांना मिळाली. पत्रकारांनी माजी सरपंच श्रीकांत पाटील यांना या घटनेची शहानिशा करावयाला सांगितले. त्यानंतर ही माहिती वनविभागाला प्राप्त झाली. जामनेर रेंज ऑफीसर समाधान पाटील, अशोक सपकाळे (वनपाल), व्ही.जी. कुळकर्णी (वनरक्षक) कल्याणसिंग पाटील, चरणसिंग चव्हाण, शे. इकबाल, लक्ष्मण इंगळे या कर्मचार्याांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. मृत प्राण्यांचा पंचनामा केला आणि पशु वैद्यकिय डॉ. व्यवहारे यांनी प्राण्यांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर जेसीबीद्वारे खड्डा खोदून जमिनीत रात्री उशिरा पुरण्यात आले. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांचे मृत्यूचे कारण मात्र गुलदस्त्यात असून त्याचा शोध वनविभागाने लावण्याची आवश्यकता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.