चोपडा सूतगिरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदारासह २२ संचालकांवर गुन्हा दाखल

0
 चोपडा-
चोपडा सहकारी सूतगिरणीत २०१६-१७ या आर्थिक वर्षात सूतगिरणी चे चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील व संचालक मंडळाने संघनमताने बनावट व खोटे प्रोसिडिंग लिहून १ कोटी १९ लाख २१ हजार २७ रुपयाचा भष्ट्राचार केल्या प्रकरणी आज अखेर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   सूतगिरणीचे संचालक भरत विठठल बाविस्कर रा वडगावसीम याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोपडा न्यायालयाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिली होती,त्यावरून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 भरत बाविस्कर याच्या फिर्यादित म्हटले आहे की,चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी मध्ये २०१६-१७ या वर्षात स्ट्रेशनरी, प्रवास,पोस्टज,कुरिअर,जाहिरात,ऑफिस ,
सल्लागार फी,टेलिफोन या शिर्षकाखाली खोटे व बनावट दस्त तयार करून खोटे प्रोसिडिंग लिहून ते खरे असल्याचे भासविले गेले आहे.तसेच २०१७-१८ या वर्षात सूतगिरणी च्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम मटेरियल खरेदी विक्री दस्ताऐवजात खाडाखोड करून वाळू खरेदी प्रकरण निविदा न काढता व्यवहार करणे अश्या अनेक प्रकारात संचालक मंडळाने संघनमताने स्वतःचे लाभ करून घेत १ कोटी १९ लाख २१ हजार २७ रुपयांचा अपहार करून सूतगिरणी च्या सर्व सभासद व शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
   या प्रकरणी सूतगिरणी चे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील,व्हाईस चेअरमन प्रभाकर पाटील,संचालक कालिदास चौधरी,माधवराव पाटील,प्रकाश पाटील,भागवत पाटील,रवींद्र पाटील,तुकाराम पाटील,डिगंबर पाटील,रामदास चौधरी,राजेंद्र पाटील ,हितेंद्र पाटील,भालेराव पाटील,शशिकांत पाटील,राहुल बाविस्कर,
समाधान पाटील,रंजना नेवे,जागृती बोरसे,तज्ञ संचालक अशोक पाटील,सुनील जैन,कार्यकारी संचालक मांतेश महाजन ,व सचिव  पंढरीनाथ पाटील,सिनियर मैनेजर सुकुमार काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भादवी ४०५,४०६,४०८,४०९,४१८,४२०,१२०ब,४६३,४६४,४६५,४६७,४६८,४७० प्रमाणे चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.