खेळताना घराची भिंत कोसळून १२ वर्षीय मुलाचा मूत्यू

0

जळगाव | शहरातील चंदुअण्णा नगरातील पोलीस कॉलनीत मित्रांसोबत शेजारील घरात लपाछपी खेळत असलेल्या १२ वर्षीय मुलाच्या अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

प्रणव पृथ्वीराज भदाणे (वय १२, रा. पाेलिस काॅलनी) असे मृत मुलाचे नाव अाहे. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रणव व गल्लीतील त्याचे काही मित्र घराबाहेर लपाछपी खेळत होते. प्रणव हा शेजारीच बंद असलेल्या घराच्या भिंतीच्या आडोशाला लपला असता त्याचवेळी त्या घराची पडदी प्रणवच्या अंगावर पडली. त्या घरात अंधार असल्याने कुणाला लवकर कळले नाही. मात्र, काही नागरिकांना प्रणवच्या अंगावर पडदी पडलेली दिसली. त्याचा घटनास्थळी मृत्यू झालेला होता. खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात अाणण्यात अाला. या वेळी त्याचे वडील पृथ्वीराज भदाणे व अाईने अाक्राेश केला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास प्रणवने वडिलांना शरबत बनवून दिले हाेते. स्वामी समर्थ विद्यालयात शिक्षण घेत हाेता. त्याचे वडील पृथ्वीराज हे जैन इरिगेशन कंपनीत कामाला अाहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.