जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न

0

जळगाव :- जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त्‍ चंद्रकांत खोसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राऊत यांचेसह समिती सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत महानगरपालिका पाणीपट्टी कर व मालमत्ता कर, जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट नव्याने मेपल फ्लोरींग करणे, संकुलात नव्याने करावायाच्या कामांसाठी वास्तुविशारद यांची नियुक्ती करणे, जिल्हा क्रीडा संकुलात स्वयंपाक घर तयार करणे,संकुलातील जुन्या व्यापारी गाळ्यांच्या संदर्भात प्रलंबित असलेल्या कोर्ट केस, गाळे हस्तांतरण, व्यापारी गाळ्यांच्या सर्व्हिस टॅक्सबाबत, इन्कम टॅक्स विभागाकडील रक्कमेबाबत, संकुलातील बीएसएनएल टॉवर, कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीबाबत आदि विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी डॉ. ढाकणे यांनी जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने करावयाच्या विविध कामांसाठी एकत्रित निविदा काढण्याच्या सुचना क्रीडा विभागास दिल्यात. तसेच जीम प्रशिक्षकांचे मानधन 8 हजार रुपयांवरुन 10 हजार रुपये करण्यास मान्यता देण्यात आली. क्रीडांगणासाठी  लागणारा रोलर जेम पोर्टलवरुन खरेदीस मान्यता देण्यात आली. तसेच लेखापरिक्षणासाठी सी. ए. ची नेमणुक करणे, जैन स्पोर्टस ॲकेडमी यांना नियमित सरावासाठी बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन देणे, सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामाचे देयक अदा करण्यासही बैठकीत मंजूरी देण्यात आली.

क्रीडा संकुलातील सोयीसुविधांचा आढावा घेणे तसेच आवश्यक ते बदल करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पुढील आठवड्यात संयुक्तरित्या क्रीडा संकुलाची पाहणी करण्याचेही बैठकीत ठरले.

Leave A Reply

Your email address will not be published.