सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस नेपानगरच्या जंगलातुन केले जेरबंद

0

– पाचोरा पोलिसांची कारवाई
पाचोरा –

पाचोरा येथे सन २०११ मधील एका गुन्हयातील तपासाकामी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर राहत नसल्याने वारंवार खोटे रहिवासीचे दाखले देवुन सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस पाचोरा पोलिसांनी नेपानगर येथील जंगलात शोध घेवुन त्याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिस अधिक्षक दत्ता शिंदे, पोलिस उप अधीक्षक केशव पातोंड यांचे मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी नेमलेल्या पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, हवालदार किशोर अहिरे, काॅन्स्टेबल राहुल सोनवणे, गजानन काळे, किरण पाटील यांच्या पथकाने आरोपीस पाचोरा येथे आणुन जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले.
भुसावळ येथील कडनेर यार्ड, सिध्दी विनायक काॅलनी येथील रहिवासचा पुरावा जोडलेल्या रमेश गोमला बिलाला वय – २६ हा सन २०११ च्या केस नं. २९६/११ या गुन्ह्यात संशयीत आरोपी म्हणून हवा होता. मात्र तो नियमीत वेगवेगळ्या ठिकाणचा व चुकीचा पत्ता देत असल्याने पोलिसांना शोध घेणे कठीण जात होते. पाचोरा येथील पोलिस पथकाने भुसावळ येथील त्याने दिलेल्या पत्त्यावर जावुन सखोल व गुप्त माहिती मिळविल्याने रमेश बिलाला हा डवाली खु” ता. नेपानगर जि. बुऱ्हाणपूर येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून व वेशभुषा बदलुन बुऱ्हाणपूर येथील दुर्गम भागात आरोपीचा शोध घेतल्याने आरोपी रमेश बिलाला यास अटक करून पाचोरा पोलिस ठाण्यात आणल्यानंतर जळगांव न्यायालयात हजर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.