“खेळ मांडियला” कार्यक्रमात वाडी – शेवाळे येथील सुनिता मोरे ठरल्या पैठणी विजेत्या

0

पाचोरा (प्रतिनिधी) –

पाचोरा येथील होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर प्रस्तुत “खेळ मांडियेला” या कार्यक्रमात पैठणीच्या विजेत्या सुनिता मोरे (वाडी – शेवाळे ता. पाचोरा), तर उप विजेत्या सुमनबाई जगताप (वरखेड), अनिता सिनकर (पाचोरा), मिराबाई महाजन (कृष्णापुरी, पाचोरा), मिनाबाई बोरसे वडगांव ता. पाचोरा) या ठरल्या. रक्षाबंधना निमित्त पाचोरा – भडगांव शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आयोजित माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे प्रेरणेने पाचोरा – भडगांव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात पाचोरा – भडगांव तालुक्यातील १० हजार महिलांनी हजेरी लावली. सुमारे चार तास चाललेल्या कार्यक्रमात आदेश बांदेकर यांनी हसत ठेवले. कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख आर.ओ.पाटील, आमदार किशोर पाटील, उद्योगपती मुकुंद बिल्दिकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, इंदिराताई पाटील, सह संपर्क प्रमुख अंजली नाईक, चाळीसगाव येथील महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रतिभा पवार, पाचोरा तालुका महिला आघाडी प्रमुख वंदना पाटील, माजी नगराध्यक्षा सुनिता पाटील, निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या चेअरमन वैशाली सुर्यवंशी, उप तालुका प्रमुख वंदना पाटील, शहर प्रमुख सुनंदा पाटील, बेबाबाई पाटील, कमलबाई रघुनाथ पाटील उपस्थित होत्या.
पाचोरा येथील सारोळा रोडवरिल समर्थ लाॅन्स येथे निमित्त रक्षाबंधनाचे ! , अतुट नाते भाऊ-बहीनींचे !! पाचोरा – भडगांव तालुक्यातील गृहीणींचे स्वप्न साकार होण्यासाठी आदेश बांदेकर यांचा राहुल खोकले निर्मीत “खेळ मांडियेला” या कार्यक्रमात पाचोरा – भडगांव तालुक्यातील व शहरातील आलेल्या तीस हजार प्रवेश पत्रिकांमधुन प्रत्येक वेळी ५० कुपने काढुन नाव निघालेल्या महिलांना बांदेकर यांनी संगित खुर्ची, विविध खेळांतील कौशल्य करण्याची स्पर्धा घेवुन स्पर्धेतुन बाद झालेल्या प्रत्येक महिलेस आमदार किशोर पाटील यांचेवतीने बक्षिसे आदेश बांदेकर यांच्या हस्ते देण्यात आले. पाचोऱ्यात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रथमच महिलांच्या अलोट गर्दीमुळे संपूर्ण शहरात एकच चर्चेचा विषय ठरला. यावेळी अनेक महिलांनी गंमतीशीर उखाणे घेऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, गणेश पाटील, अॅड. दिनकर देवरे, डॉ. भरत पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, युवासेनेचे पप्पु राजपुत, संदिपराजे पाटील, नगरसेवक रहेमान तडवी, संगिता पगारे, भरत खंडेलवाल, आमदांराचे स्विय सहाय्यक राजेश पाटील सह पाचोरा – भडगांव तालुक्यातील पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांनी धरला सैराटच्या गाण्यावर ताल – “खेळ मांडियेला” या कार्यक्रमात सुमारे १० हजार महिलांची उपस्थिती होती. खेळ सुरू असतांना अधुन – मधुन फुगडी व विविध सिनेमांच्या गाण्यावर नृत्य सादर करुन महिलांनी सैराटच्या “झिंग झिंग झिंगाट” या गाण्यावर ताल धरला.
*स्पर्धेतील वाडी – शेवाळे येथील प्रथम विजेत्या ठरलेल्या सुनिता मोरे तर उपविजेत्या सुमनबाई जगताप (वरखेड ता. पाचोरा), अनिता सिनकर (पाचोरा), मिराबाई महाजन (कृष्णापुरी, पाचोरा), मिनाबाई बोरसे (वडगांव ता. पाचोरा) यांना आदेश बांदेकर, आमदार किशोर पाटील, माजी आमदार आर. ओ. पाटील, संजय सावंत, महानंदा पाटील, इंदिराताई पाटील, सुनिता पाटील, वैशाली सुर्यवंशी यांचे हस्ते पैठणी देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.