पहूर येथे अटलजींचा दशक्रिया विधी : ग्रामस्थ व पदाधिकार्यांनी केले मुंडन

0

पहूर:ता जामनेर:

भारतरत्न माजी प्ंतप्रधानस्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा दशक्रिया विधीसोबतच गंधमुक्तीचा कार्यक्रम ग्रामस्थ व स्थानिक भाजपा पदाधिकार्यांच्या वतीने शनिवारी प्रवित्र केवडेश्वरमहादेव मंदिर येथे करण्यात आला.विशेष म्हणजे विधीवत पूजन करून काही जणांनी मूंडण केले आहे.
याप्रसंगी जेष्ट पदाधिकारी शांताराम लाठे यांच्या हस्ते प्रमुख विधी करण्यात आला.हेमंत जोशी यांनी पौराहित्य केले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते पिंडदान करण्यात आले. यादरम्यान लेले विद्यालयाचे सचिव डॉ. विजय लेले, उपध्यक्ष साहेबराव देशमुख , माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, रोहयोचे तालुका अध्यक्ष ,समाधान पाटील,अँड एस आर पाटील, शरद पांढरे, सलीम शेख गणी, फिरोज तडवी, अरूण घोलप, ललीत लोढा,संतोष चिंचोले,गोकूळ कुमावत ज्ञानेश्वर पांढरे
प्रभाकर कुमावत वासुदेव घोंगडे, लक्ष्मण गोरे मुकुंद जोशी , सुभाष जोशी, नयन जोशी, राकेश भट , राहूल घरोटे, अमोल कुमावत,शरद बेलपत्रे, ज्ञानेश्वर पवार, संदिप बेढे,मोहन जोशी यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विधीनंतर वाघूर नदीत शांताराम लाठे राजधर पांढरे मोहन जोशी डॉ विजय लेले अरूण घोलप यांच्या सह पदाधिकार्यांनी पिंड विर्सजन केले. व कार्यक्रमस्थळी प्रसादाचे वाटप करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.