साखळी पद्धतीने मार्केटिंग करणे गरजेचे -सीताबाई मोहिते 

0
पहिल्या दिवशी गटांची बचत साडेतीन लाखाची उलाढाल

भुसावळ दि . ९ (प्रतिनिधी )-

अभ्यासपूर्वक रित्या व्यवसाय केल्यास उद्योग नक्कीच मोठा होंतो याकरिता साखळी पद्धतीने मार्केटींग करणे गरजेचे असल्याचे सांगत बचत गटांच्या  माध्यमातून उत्कृष्ट रित्या  साखळी पद्धतीने मार्केटिंग होऊ शकते व ती  करणे आजच्या काळाची गरज आहे म्हणून बचत गटांच्या महिलांनी त्या अनुषंघाने कार्य करावे आवाहन जालना येथील कृषिभूषण उद्योजिका सौ सिताबाई मोहिते यांनी केले . येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर  आज दिनांक ९ रोजी गुरुनाथ फाउंडेशन तर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात बचत गटां तील  महिलांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.आजच्या मार्गदर्शन कार्यक्रमास पालघर येथील स्टेप -अप इंडिया  च्या  अध्यक्षा यती राऊत यांनीही महिलांना मार्गदर्शन केले .
     यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यस्थानी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा. ए.टी. पाटील, खा. रक्षा खडसे,  डॉ. राजेंद्र फडके, लता करे, यती राऊत, नगराध्यक्ष रमण भोळे, उद्योगती मनोज बियाणी, प्रा. डॉ. सुनील नेवे, जि.प. शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, जि.प. सदस्या पल्लवी सवकारे,  माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, जि.प. माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, पं.सं. सभापती प्रीती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, प्रमोद सावकारे, ऍड. बोधराज चौधरी, माजी नगरसेवक वसंत पाटील, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, माजी सभापती सुनील महाजन, जि.प. सदस्य आत्माराम कोळी, नगरसेवक नितीन माळी (वरणगाव), शैलजा पाटील, अलका शेळके ,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
यावेळी पुढे बोलतांना मोहिते म्हणाल्या प्राथमिक शिक्षणासाठी वयाच्या  मर्यादा असतात. जिवन चांगले  जगण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. पिकविलेले धान्य विकण्यासाठी मार्केटींगची गरज आहे. तसेच पिकविलेला माल स्वत: विकणे शिका. महिलांची बचत बँकेपर्यंत पोहचली आहे. मात्र बचत गट सावकारी पुरते नको तर  व्यवसासायात आणण्याचा प्रयत्न करा असे आवाहन सुद्धा  सिताबाई मोहिते (जालना) यांनी केले. आपल्या शेती मालावर प्रक्रिया करुन त्याचे ग्रेडींग कराव व पॅकींग करुन विकायला शिका. मालाची दररोज मार्केटिंग करा. कमी पैशात सुरु केलेला व्यवसायही वाढतो  फक्त आत्मविश्‍वास हवा असा अनुभव त्यांनी कथन केला. बचत गटांच्या माध्यमातून मार्केटींग सोपे आहे. गटातील महिलांच्या कौशल्याचा फायदा घेऊन मार्केटींग सोपे करण्याचा सल्ला देत. उद्योगकाच्या डोक्यावर बर्फअसवा, राग नको,  व जीभेवर खडीसाखर ठेवावी असे सुत्र दिले. मार्केटींगची सुरुवात शेजार्‍यापासून करुन, गाव, तालुका, जिल्हा, राज्यावर पोहचा. बायका प्रचाराचे चांगले माध्यम आहे त्याचाही उपयोग करुन घ्या. एखाद्या नोकरी करतांना एकाच परिवाराचे भले होते व त्यात सेवानिवृत्ती आहे. मात्र व्यवसायात सेवानिवृत्ती नसून अनेक परिवारांचे भले होते. त्यामुळे व्यवसायाकडे वळा असा सल्ला दिला.

 जालना जिल्हा दुष्काळी असल्यामुळे उद्योगासाठीच्या इमारतीखाली २ लाख लिटर पाण्याची टाकी तयार केली आहे. पावसाचे पाणी त्यात सोडनू दुष्काळी परिस्थितीत शेती व उद्योगाला या पाण्याचा उपयोग करण्यात येतो. यावर नर्सरीतील ४-५ रोपांचे संगोपन होत आहे. संशोधनातून, वर्षभरात दोन वेळेस आंबा उत्पादन देणार्‍या आंब्याची जात तयार केली आहे. शेतकरी हक्कमधून त्याचे पॅटर्न घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिद्द असल्यास इच्छापूर्ती शक्य- लता करे

 आपल्या कडे जिद्द असेल तर मनातील इच्छा पूर्ण होते. त्याच हिमतीवर आजारी असतांना ६३ व्या वर्षी बारामती मॅरेथॉन जिंकून पतीचे उपचार केले. महिलांनी मनात जिद्द ठेवून कार्य पार पडण्याचा सल्ला दिला. तसेच आपल्या जिवनावर  परज्योत फिल्म प्रोडक्शन ने  चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात आपण  स्वत: व स्वत:च्या मुलाने काम केले असल्याचे सांगितले. या चित्रपटात त्या ३०० मीटर धावल्या आहे. सिनेमात संघर्ष गाथा असल्याने विविध खडतर सिन त्यांनी आर्टीफिशन व विना संरक्षण केले आहे.
 अपभ्रमामुळे मासिक पाळीच्या अवहेलना- यती राऊत
 अपभ्रमामुळे मासिक पाळीला अवहेलना मिळाली आहे. वास्तविक मासिक पाळी आहे म्हणून जग आहे. ती महिलांना मिळालेले वरदान असल्याच्या त्या म्हणाले.
 बचत गटांना आपल्या उत्पादनाची किमत आपल्याला माहित असते ती किंमत ठरवावी लागते. बचत गटांनी जीएसटी, आयटीआर,  ऑडीट करुन सीएचे मार्गदर्शन घ्यावे. देशासोबत बचत गटांनीही डिजीटल होण्याची आवश्यकता आहे. सोशल मिडीयार गप्पा मारतांना मार्केटींग करा. बचत गाटांचे ‘एकीतून समृद्धीकडे. एकत्र व सर्वत्र असे ब्रीद वाक्य असवावे असे सांगितले.


बहिणाबाई महोत्सवाचे माध्यमातून महिलांना प्रेरणादायी ऊर्जा मिळणार – खा . ए टी पाटील
गुरुनाथ फाउंडेशन अध्यक्षा  खासदार रक्षा खडसे यांच्या प्रेरणेने आयोजित या महोत्सवाचे माध्यमातून महिलांना प्रेरणादायी ऊर्जा मिळणारअसल्याचे प्रतिपादन खा ए टी पाटील यांनी केले . जिद्द निर्माण झाली म्हणजे व्यक्ती नक्की मोठा होतो . असे सांगून महाराष्ट्रात १८ वर्ष दूध विक्रीचे कार्य केल्याचा स्वानुभव कथन केला. महोत्सवास शुभेच्छा दिल्या .

बहिणाबाई पाररितोषिक पुरस्कारार्थी ७ महिलांचा सन्मान
 प्रसंगी बहिणाबाई पाररितोषिक पुरस्कारार्थी महिलांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये धुळे येथील हर्षाली सैंदाणे (कुस्तीपटू), जालना येथील कृषीभूषण सौ सिताबाई  मोहिते, पालघर येथील यती  राऊत, धावपटू ६३ वर्षीय महिला लता  करे , भडगाव येथील निशा पाटील (शौर्य पुरस्कार ), खिरोदा प्रभावती सुधीर पाटील, ज्योती लीलाधर राणे , यांचा समावेश आहे .
बचत बटांची हिल्या दिवशी साडेतीन लाखांची विक्रमी उलाढाल
बहिणाबाई महोत्सवात लावण्यात आलेल्या ३५० बचत गटांनी पहिल्या दिवशी विक्रमी विक्री करून एकूण ३ लाख ४२ हजार ४०० रुपयांची  विक्री झाली . त्यामुळे या बचत गटामधून टॉप १० बचत गटांच्या प्रमुखांना  प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले . यात ओम शांती महिला बचत गट  रायपुरे, कलाबाई , श्रीराम महिला बचत गट खडका अर्चना भिरूड , चोपडा  हातेड येथील शिवम बचत गट वंदना पाटील , जळगाव शीतल जावळे , संत गाडगेबाबा , महाकालेश्वर बचत गट , समृद्धी साडी सेंटर , लिटिल फ्लॉवर संजीवनी यावलकर , माथेरान येथील कर्जत चा ओम लेदर आर्ट यांचा समावेश आहे .
     लकी ड्रा विजेत्यांना पारितोषिक
या महोत्सवात दर  दोन तासाला लकी ड्रा काढण्यात येतो त्यानुसार भाग्यवान विजेत्याला मान्यवरांचे हस्ते बक्षीस देण्यात येते. आजचे भाग्यवान  विजेते कल्पना सोनवणे , सविता चौधरी, व होमगार्ड प्रयाग सपकाळे हे आहेत .
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खा रक्षा खडसे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रकाश लोडते यांनी केले . पुरस्कारार्थी लता  करे  यांच्या जीवनावर आधारित”लता  भगवान करे  एक संघर्ष गाथा ” या चित्रपटाचा प्रोमो पहिल्यांदा बहिणाबाई महोत्सवात भुसावळात  झाला .सायंकाळी तीन गटात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संप्पन्न झाल्या . पुरस्कारार्थीं महिलांनी मनोगत व्यक्त केले .

Leave A Reply

Your email address will not be published.