महामानवाला अपशब्द वापरल्यामुळे भुसावळात राडा

0

भुसावळ शहर पोलीस स्टेशन समोर भीमसैनिकांचे ठीया आंदोलन

भुसावळ, दि. १० – व्हाट्सअप वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट केल्याने येथील शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोठा जमाव जमला होता.

व्हाट्सअप वर टाकलेली पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यास अटक करण्यात यावी, यासाठी शहरातील चाळीवरील नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यासमोर गर्दी करीत अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्या समोर ठिय्या आंदोलन मांडले होते. पोलिसांतर्फे जमावाला शांततेचे आवाहन करण्यात येत होते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता डी वाय एस पी गजानन राठोड पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. यावेळी जमावाने पोलिसांना लेखी निवेदन देऊन अपशब्द वापरणारी पोस्ट टाकल्याबद्दल संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती कळताच भुसावळ शहरातील DYSP  राठोळ, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि बाजार पेठे पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक देविदास पवार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.