साईकृपा बेंटेक्स ज्वेलरी प्रायोजित घरगूती गणेशोत्सव लोक आरास स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकशाही, लोक लाईव्ह च्या वतीने आयोजित केलेल्या आणि  साईकृपा बेंटेक्स ज्वेलरी यांनी प्रायोजित केलेल्या  घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेचे उद्या (दि. २८ नोव्हें) रविवारी रोजी दुपारी चार वाजता या अभूतपूर्व स्पर्धेचा निकाल घोषित होणार आहे.

पारितोषिक वितरण सोहळ्यास नाशिक येथील माधवदास महाराज राठी हे उपस्थित राहणार असून या निमित्ताने साऱ्या महाराष्ट्राला लोक लाईव्हच्या माध्यमातून आशिर्वचन देणार आहेत. तसेच  महाराष्ट्रातील प्रसिद्ध जळगाव येथील वेद पाठशाळेचे संस्थापक साखरे गुरुजी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी प्रभाकर कला संगित अकादमीच्या डाॅ. अपर्णा भट कासार यांची शिष्या कु. मृण्मयी कुळकर्णी गणेश वंदना सादर करणार आहे. आशा फाउंडेशनचे माजी संचालक गिरीश कुलकर्णी यांनी परीक्षण केले. प्रत्येक व्हिडीओचे व्ह्यु आणि लाईक्सचे देखील गुणांकन केले गेले आहे.

साईकृपा बेंटेक्स ज्वेलरीच्या संचालिका हेमलता बामणोदकर यांनी या कार्यक्रमाला प्रायोजित करत स्पर्धेत विजेत्या आरासला पहिले बक्षीस कांजीवरम साडी, दुसरे बक्षीस पैठणी,  तर तिसरे बक्षीस डायमंड नेकलेस  आणि उत्तेजनार्थ लक्ष्मीहार असे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

तर लोकप्रिय आरास म्हणजे सर्वात जास्त व्ह्यु आणि लाईक्स आणि कॉमेंट्सचे गुणांकन करून पहिले आणि दुसरे बक्षीस पैठणी, तिसरे बक्षीस लक्ष्मीहार असे पारितोषिक देऊन २८ नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी साडेचार  वाजता ऑनलाइन पद्धतीने सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी सर्वांनाच ईप्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

लोकशाही समूहाद्वारे थेट लाईव्ह प्रक्षेपण

हा संपूर्ण कार्यक्रम लोकशाही समूहाच्या यु ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच सर्व सोशल मिडीयाद्वारे लाईव्हरित्या सर्वांना पाहता येणार आहे.

स्पर्धेत सहभागी सर्वांच्या घरातील गणपती समोर केलेल्या आरासचा व्हिडिओ लोकलाईव्ह चॅनल वर प्रसारित करण्यात आले आहे. या अनोख्या स्पर्धेत महाराष्ट्र आणि परदेशातील मराठी कुटुंबातील गणेश मूर्तीचे आणि आरास चे दर्शन गणेश भक्तांनी घेतले.

प्रथमच अशी भव्य अभूतपूर्व स्पर्धा झाली. लोकलाईव्ह चॅनल वर हे सर्व व्हिडिओ कायमस्वरूपी राहणार आहे. सर्व गणेशभक्तांना लोक लाईव्हच्या चॅनलला भेट देऊन सर्व गणपती बाप्पाचे दर्शन नेहमीसाठी घेता येणार आहे.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लिंक-

यू ट्यूब – https://youtube.com/playlist?list=PLyhiLpPbCtS3tDrNqyx979HcvMQ5MySUf

फेसबूक – https://www.facebook.com/lokshahilive/

वेबसाईट – https://lokshahilive.com/

Leave A Reply

Your email address will not be published.