सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा महागाईने भडका उडाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरगुती गॅस सिलिंडर  पुन्हा एकदा महागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत.

विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतींमध्ये बुधवारी म्हणजेच, 6 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. विनाअनुदानित 14.2 किलोंच्या सिलेंडरवर 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर दिल्लीत विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 899 रुपये झाली आहे. तर 5 किलोंच्या सिलेंडरची किंमत 502 रुपये झाली आहे.

तेल कंपन्यांनी 6 ऑक्टोबरपासून बिना सबसिडीवाल्या घरगुती वापराच्या 14.2 किलोग्राम सिलिंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे राजधानी दिल्ली आणि मुंबईतील गॅस सिलिंडरची किंमत 884.50 रुपयांवरून 899.50 रुपये झाली आहे. याआधी महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी 19 किलोग्रामच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये 43.50 रुपये वाढ केली होती. त्यावेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

याआधी सरकारने नॅचरल गॅसच्या किंमती 62 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने यात वाढ करण्यात आली होती. नॅचरल गॅसच्या किंमती वाढल्याने सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी गॅसच्या किंमतीही वाढल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.