समतानगरातील घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

0

जळगाव :- शहरातील समतानगरातील वंजारी टेकडी येथे घरफोडी करून रोख रक्कम व दागिने असा पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या चौघा जणांच्या मुसक्या आवळण्यात आले आहे. शहरातून हद्दपार केलेल्या राहुल नवल काकडे (वय-२०, रा.समतानगर), बबलू रवींद्र सपकाळे (२६) किरण किशोर गोटे (१९) बापू भावलाल सोनवणे (२२ सर्व राहणार समतानगर) असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

समतानगरातील वंजारी टेकडी येथे राहणार भागवत ओंकार अहिरे यांच्याकडे २५ ते २६ मार्च २०१९ दरम्यान घर फोडून चोरट्यांनी २ लाख रुपये रोख व ७९ हजाराचे दागिने असा ऐवज लांबविला होता. अहिरे हे कुटुंबियांसह सैलानी येथे गेले होते. तेथून परतल्यावर चोरीचा प्रकार समोर आला. याप्रकरणी अहिरे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी पथक नेमले होते. येत सहायक पोलीस निरीक्षक मेष जाणकर, मनोहर देशमुख, रामचंद्र बोरसे, दादा पाटील, रवींद्र पाटील, विजय पाटील आदींचा समावेश होता. या पथकाने शहरातील सराईत गुन्हेगारांची कसून चौकशी केली. त्यानंतर हि चोरी राहुल काकडे, बबलू सपकाळे, किरण गोटे व बापू सोनवणे या चौघांनी केल्याची खात्री झाली. त्यांना पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी त्यांनी गुन्ह्यातील कबुली दिली. दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. पंजावराव उगले व अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.